रक्ताने लिहिली सुसाईड नोट, हाताची नस कापून गळफास घेऊन तरुणीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 21:35 IST2022-04-03T21:34:07+5:302022-04-03T21:35:24+5:30

Suicide Case :शिवानीने हाताची नस देखील कापली होती. तिच्याजवळ एक सुसाइट नोटही सापडली आहे. 

Suicide note written in blood, committed suicide by girl | रक्ताने लिहिली सुसाईड नोट, हाताची नस कापून गळफास घेऊन तरुणीने संपवले जीवन

रक्ताने लिहिली सुसाईड नोट, हाताची नस कापून गळफास घेऊन तरुणीने संपवले जीवन

भोपाळ - मध्य प्रदेशातील इंदूर येथे २३ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने हाताची नस कापून रक्ताने सुसाइड नोट लिहिली. तरुणीचे एका विवाहित तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. त्याच व्यक्तीने तरुणीला धमकी दिल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं नाव शिवानी आहे. शिवानीने घरात गळफास घावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. शिवानीने हाताची नस देखील कापली होती. तिच्याजवळ एक सुसाइट नोटही सापडली आहे. 

सुसाईड नोटमध्ये तिने प्रियकराचं नाव लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की, दीपक माझं तुझ्यावर प्रेम आहे. जिवंतपणी मी तुझी होऊ शकले नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकचे एक दुकान होतं. त्याचं शिवानीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. कुटुंबीय शिवानीनं लग्न लावून देऊ इच्छित होते. विजयनगरमध्ये स्थळही पाहण्यात आलं होतं. दीपक आणि शिवानी यांना लपून छपून भेटत असताना एकदा पकडण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानीच्या काकांनी दीपकला समजावून सांगितलं होतं. दरम्यान दीपकच्या पत्नीने शिवानीला धमकी दिली होती.

क्राइम :लॉजमध्ये घुसून अल्पवयीन विद्यार्थ्याची चाकूने वार भोसकून हत्या, तीन जण ताब्यात

Web Title: Suicide note written in blood, committed suicide by girl