आत्महत्या की हत्या! विक्रोळीत सापडला मृतदेह; अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:54 IST2021-03-16T19:52:59+5:302021-03-16T19:54:16+5:30
Unidentified Body Found in Vikroli : पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे.

आत्महत्या की हत्या! विक्रोळीत सापडला मृतदेह; अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु
विक्रोळी परिसरातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे विक्रोळी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. विक्रोळीत टागोरनगर भागात ग्रुप नंबर सहामध्ये असलेल्या नाल्यात हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे.
नाल्यात सापडलेला तो मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. नाल्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे की हत्या, अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस कुठल्या पोलीस ठाण्यात संबंधित पुरुषासारखा मिळताजुळता व्यक्ती मिसिंग होता का? याचा तपास करत आहेत. सध्या तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
अलीकडेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा दहा दिवसांपूर्वी मृतदेह सापडला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्यादिवशी मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला. ५ मार्च रोजी हा मृतदेह सापडला. मात्र अद्याप ही हत्या की आत्महत्या असल्याचे उघड झालेलं नाही. मात्र, हिरेन यांच्या पत्नीने एटीएसकडे ही हत्या असल्याचे जबाबत म्हटलं आहे.