मी देखील माझं जीवन संपवत आहे, असा स्टेट्स ठेवून प्रेयसीनंतर प्रियकराने संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 09:10 PM2021-11-24T21:10:35+5:302021-11-24T21:30:30+5:30

Suicide Case : आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक बंडू कडू (वय २३, रा. आपटी) व घोडेगाव (ता. जामखेड) येथील अल्पवयीन युवती यांचे प्रेमसंबंध होते.

The suicide of a minor lover; Within a few hours, the boyfriend ended his life | मी देखील माझं जीवन संपवत आहे, असा स्टेट्स ठेवून प्रेयसीनंतर प्रियकराने संपवले जीवन 

मी देखील माझं जीवन संपवत आहे, असा स्टेट्स ठेवून प्रेयसीनंतर प्रियकराने संपवले जीवन 

Next

जामखेड : प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच काही तासांतच तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील आपटी येथे घडली. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


एकाच दिवशी दोघा प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक बंडू कडू (वय २३, रा. आपटी) व घोडेगाव (ता. जामखेड) येथील अल्पवयीन युवती यांचे प्रेमसंबंध होते. बुधवारी (दि. २४) दुपारी आपटी येथील मामाच्या घरी प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती याच गावात राहणारा तिचा प्रियकर अशोक कडू यास समजली. त्यानंतर तो खात्री करण्यासाठी मुलीच्या घरी गेला.

प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे समजताच प्रियकर अशोक कडू याने व्हॉटस्ॲपवर मी देखील माझे जीवन संपवीत आहे, असे स्टेटस ठेवून दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक निरीक्षक सुनील बडे, नाईक संभाजी शेंडे आदींनी भेट दिली

Web Title: The suicide of a minor lover; Within a few hours, the boyfriend ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app