बारामती तालुक्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:09 IST2019-01-31T15:39:03+5:302019-01-31T16:09:38+5:30

माळेगाव बु ( ता.बारामती ) येथील पंधरा वर्षीय मुलीने युवकांच्या छेडछाडीला कंटाळून  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Suicide of a minor girl due to torture in a Baramat taluka | बारामती तालुक्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या  

बारामती तालुक्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या  

ठळक मुद्दे विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगवी : माळेगाव बु ( ता.बारामती ) येथील पंधरा वर्षीय मुलीने युवकांच्या छेडछाडीला कंटाळून  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. साक्षी विद्याधर उघाडे अस गळफास घेतलेल्या मुलीच नाव आहे. बुधवार ( दि.३० ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माळेगाव बुद्रुक येथील  राहत्या घरी तिने आत्महत्या केली आहे. 
याबाबत फिर्यादी विद्याधर लहु उघाडे (वय ४८ वर्षे  रा. माळेगाव बु.) यांनी आरोपी गौरव संजय भोसले, वामन सूर्यकांत भोसले दोघे माळेगाव बुद्रुक ( ता.बारामती ) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. 
आरोपी गौरव भोसले, वामन भोसले दोघे गेली दोन महिन्यांपासून मयत  साक्षी हिचा पाठलाग करून तिची छेडछाड काढत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचे जीवन जगणे कठीण केले होते. या त्रासाला कंटाळून अखेर साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सी.बी. बेरड हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Suicide of a minor girl due to torture in a Baramat taluka