खळबळजनक! सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 21:01 IST2020-07-01T20:50:55+5:302020-07-01T21:01:19+5:30
मंगळवारी रात्रीच्या सुमारास सतीश हा घरून निघून गेल्याबाबतची तक्रार तिवसा पोलिसांत नातेवाइकांनी दाखल केली.

खळबळजनक! सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या
तिवसा (अमरावती) : येथील विद्युत कॉलनीस्थित सलून व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सतीश मनोहर धानोरकर (३५, रा. तिवसा), असे मृताचे नाव आहे. त्याचे तिवसा पेट्रोलपंप चौकात सलून होते. दोघे भाऊ ते चालवित होते.
तीन महिन्यांनंतर बंद असलेले दुकान जेमतेम सुरू झाले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सतीश हा घरून निघून गेल्याबाबतची तक्रार तिवसा पोलिसांत नातेवाइकांनी दाखल केली. त्याचा शोध घेत असतानाच बुधवारी सतीशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत स्थानिक बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. सलून व्यावसायिक म्हणून सर्वपरिचित असल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आत्महत्येमागील कारण पुढे आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह
ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात
मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार
इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात