Suicide committed by wife of owner of Atlas Bicycle Company | अ‍ॅटलास सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने केली आत्महत्या
अ‍ॅटलास सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने केली आत्महत्या

ठळक मुद्देसंजय कपूरसुद्धा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात.बुधवारी नताशा कपूर यांचे आरएमएल रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. नताशा कपूरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ती आपल्या आयुष्यात आनंदी नाही.

नवी दिल्ली -  अ‍ॅटलास या सायकल कंपनीच्या मालकांपैकी एक मालक संजय कपूरची पत्नी नताशा कपूर (५७) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्राथमिक तपासात दिल्लीपोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. परंतु खोलीचा दरवाजा उघडा असल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल तपास सुरु केला आहे.

दिल्लीतील औरंगजेब लेन परिसरातील कोठी येथे  पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा कपूरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ती आपल्या आयुष्यात आनंदी नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,आत्महत्येस आर्थिक संकट देखील कारणीभूत ठरू शकते. नवी दिल्ली जिल्ह्यातील तुघलक रोड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार असून या प्रकरणाचा तपास करत आहे. बुधवारी नताशा कपूर यांचे आरएमएल रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर नताशा कपूर यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी लोधी रोडवरील स्मशानभूमीत नताशा कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कपूर यांचे कुटुंब औरंगजेब लेन, दिल्ली येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे. संजय कपूरसुद्धा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात.

मंगळवारी दुपारी नताशा कपूर यांनी दुपारचे जेवण घेतले नाही. तेव्हा घरातील लोकांनी त्याचा शोध सुरू केला. संजय कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर यांनी फोन केला असता नताशा कपूर यांनी फोनही उचलला नाही. यानंतर नताशा कपूरचा मृतदेह एका खोलीत पंख्याला लटकलेला आढळला. यानंतर डॉक्टरांना बोलविण्यात आले व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मुलगा सिद्धांत कपूर यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना याची माहिती दिली.

Web Title: Suicide committed by wife of owner of Atlas Bicycle Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.