अर्धांगवायूला कंटाळून वृद्धाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 21:10 IST2018-08-02T21:09:52+5:302018-08-02T21:10:21+5:30

८५ वर्षीय दत्तू मारुती पिसाळ यांनी आत्महत्या केली; याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली

Suicide committed by aged aging by paralyzed paralysis | अर्धांगवायूला कंटाळून वृद्धाने केली आत्महत्या

अर्धांगवायूला कंटाळून वृद्धाने केली आत्महत्या

मुंबई - आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास नायगाव येथील जुनी बी. डी. डी. चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ८५ वर्षीय दत्तू मारुती पिसाळ यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे वयोवृद्ध अर्धांगवायूने ग्रस्त होते. ते कुटुंबासह करीम गणी चाळ, राजाराम वाडी येथे राहत होते. काही वर्षांपूर्वी ते नायगाव येथील जुनी  बी. डी. डी. चाळ क्रमांक १ येथे राहत होते. 

आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास जुनी  बी. डी. डी. चाळ क्रमांक १ येथे जाऊन तिसऱ्या मजल्यावरून ८५ वर्षीय आजोबांनी उडी मारून आपला जीव संपवला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी ५. ४० वाजता त्यांना मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Suicide committed by aged aging by paralyzed paralysis