पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:39 IST2018-08-16T17:39:04+5:302018-08-16T17:39:41+5:30
चोरीच्या संशयावरून पोलिसांनी घेतले होते बबन पवारला ताब्यात

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने केली आत्महत्या
यवतमाळ - चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. यवतमाळच्या अमराईपुऱ्यात आज सकाळी हि खळबळजनक घटना घडली आहे. बबन लक्ष्मण पवार (५०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी टोळीविरोधी पोलीस पथकाचे प्रमुख फौजदार संतोष मनवर यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. चारचाकी चोरीच्या संशयावरून बबनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, माझा काहीही या चोरीशी संबंध नसून माझी बदनामी होत असल्याची मी आंत्महत्या करत असल्याचे सुसाईट नोटमध्ये बबन लिहिले आहे. बबनची सुसाईट नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरु केला आहे.