२८ वर्षीय अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:16 IST2019-01-30T17:05:17+5:302019-01-30T17:16:27+5:30

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

Suicide: 28-year-old actor jailed | २८ वर्षीय अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या  

२८ वर्षीय अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या  

ठळक मुद्दे या अभिनेत्याचं नावं राहुल दीक्षित असं आहे.राहुल दीक्षितने आत्महत्या का केली? याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे. 

मुंबई - 28 वर्षीय टीव्ही अभिनेत्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अभिनेत्याचं नावं राहुल दीक्षित असं आहे. ओशिवरा येथील राहत्या घरी राहुलने सिलिंग पंख्याला गळफास घेऊन ही आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

घटनास्थळी सुसाईट नोट सापडलेली नसून राहुलचे वडील महेश दीक्षित यांनी त्यांच्या फेसबुकवर इस दुनिया को क्यू छोड कर चला गया राहुल असा खेदजनक मेसेज पोस्ट केला आहे. यापूर्वीही अनेक बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. वैयक्तिक किंवा कामाच्या ठिकाणी आलेल्या नैराश्यातून या आत्महत्या केल्या होत्या. राहुल दीक्षितने आत्महत्या का केली? याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Suicide: 28-year-old actor jailed