दहा महिन्यापूर्वी लग्न, पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध, पतिला बसला धक्का; उचलले टोकाचे पाऊलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:17 IST2023-01-16T13:16:51+5:302023-01-16T13:17:40+5:30

उत्तर प्रदेशमधील भडोही परिरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरियडपट्टी येथे राहणाऱ्या एका मजुराने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

suffering from wife infidelity husband commits suicide in hadohi | दहा महिन्यापूर्वी लग्न, पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध, पतिला बसला धक्का; उचलले टोकाचे पाऊलं...

दहा महिन्यापूर्वी लग्न, पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध, पतिला बसला धक्का; उचलले टोकाचे पाऊलं...

उत्तर प्रदेशमधील भडोही परिरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरियडपट्टी येथे राहणाऱ्या एका मजुराने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शहर कोतवालीच्या धरोहर चौकी भागात राहणारा सतीश कुमार हरिजन याचे पूजासोबत १० महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पूजाचे लग्नापूर्वी एका तरुणावर प्रेम होते आणि लग्नानंतरही ती तिच्या प्रियकराला भेटत होते.

पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती सतीशला मिळाली होती. रविवारी सायंकाळी उशिरा सतीश मजुरी करून घरी परतला, तेव्हा पत्नीशी बोलत असल्याचे पाहून त्याने मोबाईल हिसकावून घेतला. त्याची पत्नी आपल्या प्रियकराशी बोलत असल्याची माहिती त्याला मिळाली. यावरून दोघांमध्ये वाद व हाणामारी झाली. यानंतर पूजाने तिच्या प्रियकराला फोनवर बोलावले आणि त्याच्यासोबत गेली. या घटनेनंतर सतीशने खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

व्हॉट्स अ‍ॅपवर मित्राचा फोटो लावून नातेवाइकांची केली फसवणूक; १ लाख रुपये उकळले

या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहा महिन्यांपूर्वीच सतीशचा पूजाशी विवाह झाला होता. यानंतर काही दिवसातच पत्नीचे वागणे सतीशला पटत नव्हते. यावरुन दोघांमध्ये सतत भंडण होत होती. अखेर सतीश पत्नीच्या वागण्याला कंटाळला होता. 

Web Title: suffering from wife infidelity husband commits suicide in hadohi