अचानक घरातून निघून गेला, कालव्यात सापडला सडलेला मृतदेह; मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये काय दिसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:17 IST2025-01-23T18:16:10+5:302025-01-23T18:17:19+5:30
मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या आणि नोकरीमुळे गुरूग्राममध्ये कुटुंबासह राहत असलेला एक व्यक्ती अचानक घरातून निघून गेला. त्याचा आठ दिवसांनी गाझियाबादमध्ये एका कालव्यात मृतदेह आढळून आला.

अचानक घरातून निघून गेला, कालव्यात सापडला सडलेला मृतदेह; मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये काय दिसलं?
गुरूग्राममध्ये वास्तव्याला असलेल्या एका ३३ वर्षीय व्यक्तीचा सडलेला मृतदेह गाझियाबादमधील कालव्यात आढळून आला. एका आठवड्यापूर्वी मयत व्यक्ती घरातून निघून गेला होता, २२ जानेवारी रोजी त्याचा मृतदेहच सापडला. प्रिन्स राणा, असे या व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा आहे. गुरूग्राममध्ये प्रोजक्ट मॅनेजर म्हणून तो काम करत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागच्या बुधवारी प्रिन्स राणा हे घरातील कोणलाही कल्पना न देता निघून गेले. ते मोबाइलही घरातच ठेवून गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याचे प्रकरण नोंदवून घेतले.
सर्च हिस्ट्रीमध्ये सुसाईड पॉईंट
प्रिन्स राणा यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले की, जेव्हा त्यांचा फोन चेक केला, तेव्हा सर्च हिस्ट्रीमध्ये त्यांनी सुसाईड पॉईंट सर्च केलेलं आढळून आलं. त्यामुळे कुटुंबातील सगळेच घाबरले. गुरूग्राममधील पोलिसांकडून आठवडाभरापासून त्यांचा शोध सुरू होता.
वॉलेटमध्ये होतं आधार कार्ड
दरम्यान, गाझियाबाद येथील पोलिसांना गंगानहर कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती गुरुग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी सडलेला मृतदेहाची तपासणी केली, तेव्हा वॉलेट सापडले, त्यात प्रिन्स यांचं आधार कार्ड होतं. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांना बोलवण्यात आले. तो मृतदेह प्रिन्स राणा यांचा असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ गौतम यांनी सांगितले की, प्रिन्स राणा हे गुरूग्राममधील सेक्टर २२ मध्ये राहतात. ते १५ जानेवारी रोजी अचानक घरातून निघून गेले. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रा नोंदवण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. २२ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह कालव्यात सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, रिपोर्ट आल्यानंतर याबद्दल जास्तीची माहिती देता येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे."