पोलिसांचा असाही एक चेहरा! बेघर वृद्ध महिलेला पोलिसाने स्वतःच्या हाताने घातले खाऊ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:21 PM2021-06-01T18:21:46+5:302021-06-01T18:23:04+5:30

Police Praise on social media : या फोटोमध्ये दिसत असलेल्या पोलिसाचे कौतुक लोक करत आहेत.

Such a face of the police! The homeless old woman has given food by the police | पोलिसांचा असाही एक चेहरा! बेघर वृद्ध महिलेला पोलिसाने स्वतःच्या हाताने घातले खाऊ 

पोलिसांचा असाही एक चेहरा! बेघर वृद्ध महिलेला पोलिसाने स्वतःच्या हाताने घातले खाऊ 

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध आणि बेघर महिलेला खायला घालत असल्याचं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कधीकधी अशी काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येतात ज्या पाहून आपण आनंदित होते आणि आपल्याला वाटतं की अजून तरी माणुसकी जिवंत आहे. अशीच काही छायाचित्रे आहेत जी आपल्याला माणुसकीची शिकवण देतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध आणि बेघर महिलेला खायला घालत असल्याचं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या पोलिसाचे कौतुक लोक करत आहेत.

पॅरालंपियन रिंकू हूडाने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना रिंकू हूडाने लिहिले की, “पोलिसांचा असा देखील चेहरा आहे.  #Salute  "रिंकू हूडाच्या ट्विटला आतापर्यंत जवळपास ५०० रीट्वीट आणि ६ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.कॉमेंट विभागात लोक पोलिसाची मनसोक्त प्रशंसा करत आहेत. "त्या अधिकाऱ्याला सलाम ....," अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली. दुसर्‍या युजरने लिहिले की, "चांगले काम सर जी जय हिंद." तर आणखी एका युजरने  "आम्ही जिवंत आहोत, कारण माणुसकी जिवंत आहे ... जर आपण एखाद्याला मदत करू शकलो तर आपण करायला हवे."असे कमेंट केले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "तुमचा गर्व आहे आम्हाला, शाब्बास हरियाणा पोलिस."

 

 

Web Title: Such a face of the police! The homeless old woman has given food by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app