मास्क न घातल्याने हटकले होते, राग मनात ठेवून टेलरने केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:13 IST2020-06-18T18:11:34+5:302020-06-18T18:13:43+5:30
यात सादिक खान याच्या डाव्या हाताच्या पंजाला व पाठिवर दोन गोळ्या लागल्याने तो त्यात जखमी झाला. यानंतर पत्नीने शेजाऱ्यांची मदत घेऊन जखमी सादिकला उपचारकरिता सायन रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मास्क न घातल्याने हटकले होते, राग मनात ठेवून टेलरने केला गोळीबार
मुंबई : चेंबूरच्या पी वाय थोरात मार्गावरील वझीर बाबा चाळीत एका इसमावर पूर्व वैमनस्यातून पहाटे चार वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात तो इसम गंभीररित्या जखमी झाला आहे. सादिक इनायत खान (३६) असे या जखमी इसमाचे नाव असून त्याला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे.
चेंबूरच्या पी वाय थोरात मार्गावर अमीर बाग परिसरातील वझीर बाबा चाळीत राहणाऱ्या सादिक खान याचा टेलरिंग व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी सादिक हा त्याच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयात गेला होता. यावेळी त्याने मास्क न घातल्याने बंटी राणा या तरुणाने त्याला हटकले. हटकल्याचा राग आल्याने सादिकने बंटीच्या कानशिलात लगावली व आपल्या साथीदरांच्या मदतीने बंटीवर तलवारीने वार करून त्यास जखमी केले. सुदैवाने बंटी यातून बचावला होता.बंटीवर झालेल्या हल्ल्याचा राग त्याचा भाऊ नवनीत राणा याच्या मनात बऱ्याच दिवसांपासून खदखदत होता. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास नवनीत राणा आपल्या साथीदारांसह सादिक याच्या घरी गेला व त्याचा दरवाजा ठोठावत त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. यावेळी सादिकची पत्नी मेहरुनीसा हिने दरवाजा उघडला असता नवनीत राणा व साथीदारांनी रिव्हॉल्वरने गोळीबार केला.
यात सादिक खान याच्या डाव्या हाताच्या पंजाला व पाठिवर दोन गोळ्या लागल्याने तो त्यात जखमी झाला. यानंतर पत्नीने शेजाऱ्यांची मदत घेऊन जखमी सादिकला उपचारकरिता सायन रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक