बारावी नापास झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:51 IST2019-06-07T16:49:20+5:302019-06-07T16:51:53+5:30

उज्ज्वला भगवान अस्वार (२१) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

Student's suicide due to disappointment of Class XII exam fail | बारावी नापास झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावी नापास झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या

ठळक मुद्देज्ज्वला हिचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता. उज्ज्वला हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

जळगाव - बारावीत नापास झाल्याने त्यातून नैराश्यात आलेल्या उज्ज्वला भगवान अस्वार (२१) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी शिरसोली, ता.जळगाव येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उज्ज्वला हिचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता. सकाळी तो घरी आला असता बहिणीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. लागलीच आई, वडीलांना घटनेची माहिती कळविण्यात आली. उज्ज्वला हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. उज्ज्वला हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

Web Title: Student's suicide due to disappointment of Class XII exam fail