विद्यार्थ्याची हत्या, दोन कॉन्स्टेबल जेरबंद; भोपाळमधील बी.टेक. विद्यार्थ्याचे हत्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:43 IST2025-10-13T12:43:34+5:302025-10-13T12:43:49+5:30
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये २२ वर्षीय बी.टेक. विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन कॉन्स्टेबलना अटक केली आहे. विद्यार्थ्याच्या उत्तरीय ...

विद्यार्थ्याची हत्या, दोन कॉन्स्टेबल जेरबंद; भोपाळमधील बी.टेक. विद्यार्थ्याचे हत्या प्रकरण
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये २२ वर्षीय बी.टेक. विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन कॉन्स्टेबलना अटक केली आहे.
विद्यार्थ्याच्या उत्तरीय तपासणीमध्ये मृत्यू स्वादुपिंडाच्या रक्तस्त्रावामुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर, कॉन्स्टेबल संतोष बामनिया आणि सौरभ आर्यवर शनिवारी हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. भोपाळ झोन-२ चे पोलिस उपायुक्त (डीसीपी) विवेक सिंह यांनी सांगितले की, रविवारी मध्यरात्रीनंतर या दोन्ही कॉन्स्टेबलना अटक करण्यात आली.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपमध्ये पोलिसाने विद्यार्थी उदित गायकेला धरले आहे, तर दुसरा पोलिस काठीने मारहाण करत असल्याचे दिसते.