वाह रे पठ्ठ्या! मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चोरली बाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 14:04 IST2020-10-24T14:03:45+5:302020-10-24T14:04:13+5:30
Robbery : या अजब मैत्रीचा अनुभव मुंबईतील नवघर परिसरात पहावयास मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मित्रांना बेडया ठोकल्या आहेत.

वाह रे पठ्ठ्या! मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चोरली बाईक
मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी एका मित्राने चक्क बाईक चोरली. या अजब मैत्रीचा अनुभव मुंबईतील नवघर परिसरात पहावयास मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मित्रांना बेडया ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श कनोजिया (२०) व पवन भगवानदास अहिरवार (२०) हे जिवाभावाचे मित्र! १६ आॅक्टोबर रोजी पवन याचा वाढदिवस होता. जिवाभावाच्या मित्राला गिफ्ट देण्यासाठी आदर्शने १५ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी मुलुंड पूर्व परिसरातून बाईक चोरली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी आदर्श कनोजिया व पवन भगवानदास अहिरवार यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची कसून चौकशी केली असता वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी बाईक चोरल्याचे सांगण्यात आले.