धक्कादायक! सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:13 PM2021-06-10T12:13:01+5:302021-06-10T12:13:27+5:30

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही घटना नाशिकच्या डिंडोरी तालुक्यातील एका गावातील आहे. आरोपी महिलेला पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. 

Step mother burnt private part of ten year old stepson in Nashik | धक्कादायक! सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण वाचून हैराण व्हाल

धक्कादायक! सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण वाचून हैराण व्हाल

Next

नाशिक शहरातून एका सावत्र आईने आपल्या सावत्र मुलासोबत धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या १० वर्षीय सावत्र मुलाचा प्रायव्हेट जाळल्याची (Woman Burnt Private Part Of Stepson)  धक्कादायक घटना घडली आहे. मुलाची चूक केवळ इतकी होती की, त्याने छोट्या सावत्र भावाला बेडवरून खाली पाडलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही घटना नाशिकच्या डिंडोरी तालुक्यातील एका गावातील आहे. आरोपी महिलेला पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. 

झालं असं की, पीडित मुलगा आणि त्याचा दीड वर्षांचा छोटा सावत्र भाऊ बेडवर बसून खेळत होते. खेळता खेळता पीडित मुलाने छोट्या भावाला धक्का आणि तो लहान भाऊ बेडवरून खाली पडला. याचा गोष्टीचा पीडित मुलाच्या सावत्र आईला चांगलाच राग आला. त्यानंतर तिने आधी मुलाला मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट जाळला. (हे पण वाचा : धक्कादायक! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, जबरदस्ती लग्न; मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासही पाडलं भाग)

घटनेनंतर आरोपी महिलेचा पती घरी परतला तेव्हा त्याला घडलेला सर्व प्रकार समजला. यानंतर पीडित मुलाला घाईघाईत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हिल सर्जन किशोर यांनी सांगितले की, पीडित मुलाचा प्रायव्हेट पार्ट २० टक्के भाजला आहे. आता त्याची स्थिती स्थिर आहे. (हे पण वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या)

दरम्यान, आरोपी सावत्र आईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पॉस्को अॅक्टही लावण्यात आला आहे. आरोपी महिला आधी पीडित मुलाची मामी होती. नंतर मुलाच्या वडिलाने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन मुलाच्या मामीसोबत लग्न केलं. ज्यानंतर ती मुलाची सावत्र आई झाली.
 

Web Title: Step mother burnt private part of ten year old stepson in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app