शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

By पूनम अपराज | Published: October 06, 2020 9:47 PM

SSR Case : सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती.

ठळक मुद्देरियाने वांद्रे पोलीस ठाण्यात सुशांतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती उघडकीस आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून सुरु असलेला तपास सुरु आहे. दुसरीकडे एम्स रुग्णालयाने सुशांतच्या खुनाचा दावा फेटाळला असून ही आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केले आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास सुरु असून अनेक मोठ्या सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी झाली आहे. त्यातच रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात सुशांतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती उघडकीस आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. त्यासंबंधी सुशांतची बहिण, नातेवाईक आणि काही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो गुन्हा देखील सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआय यासंबंधी तपास करेल असा विश्वास असल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे. आमच्याकडेही सुशांत सिंह ड्रग्ज घेत असल्याची माहिती आली होती. ड्रग्ज घेत असल्याने त्याचा मृत्यू झाला का याचा तपास आम्ही करत होतो, अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.याआधीच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं होतं असं सांगितलं होतं. तसेच सुशांतने गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं. बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं” अशी माहिती परमवीर सिंग यांनी पत्रकारांना दिली होती. “सुशांतच्या डॉक्टरने त्याला मानसिक समस्या असल्याचं सांगितलं होतं. त्याला बायपोलार डिसॉर्डर होता. मार्चपासून त्याने औषध घेणं बंद केलं होतं. त्यामुळे त्याचा तणाव वाढला होता,” असं परमबीर सिंग यांनी सांगितलं.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMurderखूनPoliceपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबईParam Bir Singhपरम बीर सिंग