SRPF jawan is serious in hospital who Attempted suicide | आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसआरपीएफ जवानाची प्रकृती चिंताजनक 
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसआरपीएफ जवानाची प्रकृती चिंताजनक 

ठळक मुद्देया जवानाचं नाव दत्तात्रय चव्हाण (२८) असं आहे. घरातील वादाला कंटाळून असं कृत्य केल्याचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. दत्तात्रय यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई - मलाबार हिल येथील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाने स्वत:वर  गोळी झाडून काल आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. या जवानाचं नाव दत्तात्रय चव्हाण (२८) असं आहे. या जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.   

सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न काल केला. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चव्हाण त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर चव्हाण यांना त्वरीत जखमी अवस्थेत एलिझाबेथ रूग्णालयात केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बॉम्बे रूग्णालयात हलविण्यात आले. दत्तात्रय यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दत्तात्रय हे मूळचे औरंगाबाद इथं राहणारे आहेत. दत्तात्रय चव्हाण यांच्याजवळ एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. घरातील वादाला कंटाळून असं कृत्य केल्याचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यावेळी चव्हाण सुट्टीवर होते. याप्रकरणी मलबार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


Web Title: SRPF jawan is serious in hospital who Attempted suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.