चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:39 PM2022-01-16T18:39:57+5:302022-01-16T18:40:24+5:30

Accident Case :  तेलगाव येथील रविवारी दुपारी झालेली दुर्दैवी घटना 

Speedy car hit a tree; Both killed on the spot, one seriously injured | चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

Next

दिंद्रुड (बीड) - बीड परळी महामार्गावर परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तेलगाव येथे घडली. हा अपघात एवढा भीषण व ह्रदयद्रावक होता की यात गाडीचा पुर्ण चक्काचुर होऊन, मयत व जखमींना जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. 
           

यासंदर्भात माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी एम. एच.१३सीके ०४४१ या स्वीप्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगाव मार्गे बीडला जात असताना तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबारजवळ सदर गाडी आली असता चालकाचे स्टेरिंगवरील नियंञण सुटल्याने गाडी रोडच्या लगत खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली.गाडी एवढ्या जोरात धडकली की पुर्व कडुन येणाऱ्या गाडी धडक बसताच मोठ्या वेगाने फिरून गाडीची समोरील तोंड उत्तरेकडे झाले.या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले.मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला.मयत व जखमी नांदेड जिल्ह्यातील भोकरचे असुन, नेमके कुणाचे नाव काय आहे याची ओळख पटत नाही. तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या  अंदाजावरून मयतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात असुन अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते.  त्या तरूणाचे पाय मोडला.गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले.

अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंग ने वेल्डिंग करून, एका मयतास बाहेर काढले.तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.यानंतर मयत व जखमींना १०८ रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचला.

Web Title: Speedy car hit a tree; Both killed on the spot, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app