नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोन मुलं आली घरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:28 IST2022-02-03T17:28:08+5:302022-02-03T17:28:44+5:30
Robbery Case : मंद्रेला शहरातील वॉर्ड 3 चे रहिवासी जगदीश शर्मा यांनी त्यांचा मुलगा चेतन शर्मा याचे लग्न 28 नोव्हेंबर 2021 रोजी चिरावा येथील रहिवासी निकिता या मुलीशी झाले होते, असे सांगितले.

नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोन मुलं आली घरी...
पिलानी : राजस्थानमधील झुंझुनूच्या मंद्रेला शहरातील एका विवाहित महिलेने पती आणि सासूला नशायुक्त पदार्थ पिण्यास दिला. नंतर दोन मुलांना रात्री घरी बोलावून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पलायन केले.
मंद्रेला पोलीस अधिकारी सत्यनारायण यांनी सांगितले की, मंद्रेला शहरातील वॉर्ड 3 चे रहिवासी जगदीश शर्मा यांनी त्यांचा मुलगा चेतन शर्मा याचे लग्न 28 नोव्हेंबर 2021 रोजी चिरावा येथील रहिवासी निकिता या मुलीशी झाले होते, असे सांगितले.
लग्न झाल्यापासून सुनेचे पती आणि घरातील इतर सदस्यांशी वागणे योग्य नव्हते. तसेच लग्नानंतरही ती पतीपासून काही ना काही निमित्त सांगून अंतर ठेवत असे. घरात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने कुटुंबीयांना एकमेकांविरोधात ती भडकवत असे.
पीडित मुलगा घरी राहून ऑनलाइन काम करतो. त्याचवेळी 27 जानेवारीच्या रात्री काम करत असताना चेतनने निकिताकडे चहा मागितला. निकिताने चहामध्ये नशेचा पदार्थ मिसळून प्यायला दिला, त्यामुळे चेतनची प्रकृती खालावली.
यावर शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांना दाखवून घरी आणले. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिने शेजारी बसलेल्या सासूला गरम पाणी दिले, त्यात सुनेने नशेचे औषध मिसळून दिले. यामुळे पती आणि सासू बेशुद्ध झाले होते.
अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग
त्याचवेळी आरोपी तरुणीने चिरवा येथील दोन तरुणांसह घरातून दागिने, रोख रक्कम आणि कपडे आदी मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.