शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

शाळेच्या खोलीतून ऐकू येत होता रडण्याचा आवाज, आईने धक्का देऊन दरवाजा उघडला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 21:28 IST

Pocso Case : मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते.

राजस्थानमधील करौली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकाने बलात्कार केला होता. आरोपी शिक्षकालापोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक करून तुरुंगात पाठवले. ही मुलगी गावातीलच एका शाळेत शिकत असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ती अभ्यासासाठी शाळेत गेली होती. सायंकाळी मुलीची आई तिला घेण्यासाठी शाळेत गेली असता एका खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येत असून खोलीला आतून कुलूप असल्याचे दिसले.शिक्षकाने ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलात्यानंतर मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते. आरोपीने मुलीच्या आईला पाहताच तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पोलिस अधीक्षकांनी तोडाभीम पोलिस ठाण्याचे अधिकारी रामखिलाडी मीना यांना आरोपींना लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या.पोलिसांनी 36 तासांत आरोपी शिक्षकाला अटक केलीमुलीने आपल्या जबाबात सांगितले की, शिक्षक धनराज मीना याने तिला ट्यूशनच्या बहाण्याने शाळेत बोलावले होते आणि ट्यूशनच्या बहाण्याने धनराजने तिच्यासोबत गैरकृत्य केले. पीडित मुलीने घरी येऊन सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर वडिलांनी आरोपी धनराज मीणाविरुद्ध तोडाभीम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखलतोडाभीमचे पोलीस अधिकारी राम खिलाडी मीना यांनी सांगितले की, आयपीसी कलम  ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. अवघ्या ३६ तासांत आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. या घटनेनंतर शाळेत आरोपी शिक्षकाविरोधात संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटकTeacherशिक्षक