शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Boyfriend killed Girlfriend: 'सॉरी बाबू.. आता स्वर्गात भेटू..'; गर्लफ्रेंडचा गळा कापला अन् इन्स्टाग्रामवरून केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 10:59 IST

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये २५ वर्षीय तरुणीची हत्या करणारा आरोपी प्रियकर फरार झाला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, मात्र अद्यापही आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही.

MP Crime News, Boyfriend killed Girlfriend: दिल्लीत आफताब नावाच्या तरूणाने श्रद्धा नावाच्या २६ वर्षीय तरूणीची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण ताजं असतानाच एका प्रियकराने आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर गेल्या ५ दिवसांपासून हा आरोपी फरार आहे. इतकेच नव्हे तर तो दररोज सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांना चॅलेंज करताना दिसत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांसाठी हे आता एक वेगळेच आव्हान समोर उभे ठाकले आहे.

नक्की काय घडलं?

मध्य प्रदेशच्याजबलपुरमधील एका रिसॉर्टमध्ये २५ वर्षीय तरूणीचा तिच्याच प्रियकराने गळा कापून खून केला. त्यानंतर प्रियकर तेथून फरार झाला. या प्रियकराला शोधून देईल, त्याला एक लाखाचे इनामही पोलिसांनी जाहीर केले आहे. पण असे असूनही पोलिस त्याला शोधण्यात अद्याप अपयशी ठरले आहेत.

कसा घडला प्रकार?

हे प्रकरण आहे मध्य प्रदेशच्या जबलपूर रिसॉर्टचे आहे. तिथे तरुणीची हत्या करण्यात आली. पण हत्येला ५ दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. या दरम्यान आरोपी सोशल मीडियावर काही ना काही अपडेट करत आहे. पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर करूनही तो कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आहे. आरोपीने जबलपूर येथील मेखला रिसॉर्टमध्ये हे दुष्कृत्य केले. तेव्हापासून तो फरार आहे.

सॉरी बाबू... स्वर्गात भेटू!

प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपी अभिजीत पाटीदार त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मध्य प्रदेश पोलिसांना सतत आव्हान देताना दिसत आहे. याशिवाय आरोपीने त्याच्या मृत गर्लफ्रेंडसह आयडीसह अनेक पोस्टही शेअर केल्या आहेत. गुन्हा केल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबू, मला माफ कर... आपण आता स्वर्गात भेटू…”

दरम्यान, जबलपूरचे अतिरिक्त एसपी शिवेश सिंह बघेल म्हणाले, “आम्ही सायबर क्राईम टीमला यासंबंधी सर्व तपशील विचारले आहेत. मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करणारी व्यक्ती ओळखीची व्यक्ती असू शकते किंवा ती आरोपी देखील असू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीदारने केवळ खूनच केला नाही, तर जबलपूरमधील व्यावसायिकांची लाखोंची फसवणूकही केली आहे."

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशjabalpur-pcजबलपुरInstagramइन्स्टाग्राम