सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:44 AM2021-09-19T07:44:08+5:302021-09-19T07:44:40+5:30

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते.

Sonu Sood commits tax evasion of Rs 20 crore says Income tax department | सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

Next

नवी दिल्ली/मुंबई : काेराेना महामारीच्या काळात हजाराे स्थलांतरित मजुरांना मदत करणारा चित्रपट अभिनेता साेनू सूद याने २० काेटी रुपयांची करचाेरी केल्याचा आराेप प्राप्तिकर खात्याने केला आहे. साेनू सूद याच्या निवासस्थानासह मुंबई, लखनाै आणि दिल्लीतील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापे मारले हाेते. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) साेनू सूद याच्या लखनाै येथील औद्याेगिक क्लस्टरमधील कार्यालयांवर छापे मारले हाेते. हा समूह पायाभूत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई, दिल्ली, लखनाै, कानपूरसह एकूण २८ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली हाेती. याबाबत सीबीडीटीने माहिती दिली आहे. छाप्यांमध्ये अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यातून करचुकवेगिरी उघड झाल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते. साेनू सूद याला ‘आप’ने त्याला दिल्ली सरकारच्या विद्यार्थी मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रॅंड ॲम्बेसेडर बनविले हाेते.

एफसीआरए कायद्याचे उल्लंघनही केले
साेनू सूदने बेहिशेबी पैसा बनावट संस्थांच्या माध्यमातून बाेगस कर्जाद्वारे पैसे वळविल्याचे आढळले आहे. तसेच एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आराेप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने क्राउडफंडिंग प्लॅटफाॅर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ काेटी रुपये गाेळा केल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
 

Web Title: Sonu Sood commits tax evasion of Rs 20 crore says Income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.