सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:19 IST2022-06-27T21:19:03+5:302022-06-27T21:19:59+5:30
Rape Case : याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध दिल्लीत बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने काँग्रेसच्यासोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला दलित समाजातील असून तिने उत्तम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. महिलेचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग्ज लावायचा. ज्यांचा 2020 मध्ये मृत्यू झाला.
“25 जून रोजी उत्तम नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली. भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले. फिर्यादीनुसार, लग्न आणि नोकरीच्या बहाण्याने माधवनने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.