Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:11 IST2025-06-11T14:09:09+5:302025-06-11T14:11:13+5:30
Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi: राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने सगळेच अंचबित झाले आहेत. हनिमूनला नेऊन पतीची हत्या केल्याचा आरोप सोनमवर आहे. राजाची हत्या होण्यापूर्वी ज्या गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते. त्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi News: एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, असा घटनाक्रम राजा रघुवंशी हत्या प्रकरणात समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सोनम रघुवंशीने राजाचा काटा काढला. सोनमने हत्या करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या अनेक गोष्टी समोर येत आहे. आता त्या हॉटेलचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यात हनिमूनला गेलेले राजा आणि सोनम थांबले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी सोनम रघुवंशीसह आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. राजासोबत लग्न करण्यास सोनमचा विरोध होता. पण, कुटुंबीयांनी तिचा विरोध झुगारून देत लग्न लावून दिलं. त्यानंतर सोनमने राजाची हत्या केली अशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे.
राजा-सोनम या गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते
सोनम आणि राजा हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. मेघालयातील शिलाँगमध्ये ते फिरणार होते. त्यांनी एका गेस्ट हाऊसमध्ये रुम बुक केली होती. ज्या दिवशी राजाची हत्या झाली. त्याच्या एक दिवस आधी ते या गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. बालाजी गेस्ट हाऊस असे त्याचे नाव आहे.
वाचा >>राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती?
#WATCH | Raja Raghuvanshi murder case | Visuals of the guest house in Shillong, Meghalaya, where Raja Raghuvanshi and Sonam Raghuvanshi stayed. The guest house is closed. pic.twitter.com/qtGNhm13oX
— ANI (@ANI) June 10, 2025
सोनमचा लग्नाला होता विरोध
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमला राजासोबत लग्न करायचं नव्हतं. तिने तिच्या आईला सांगितलं होतं की, राजावर नाही, तर राज कुशवाहवर प्रेम आहे. तुम्ही माझं लग्न राजासोबत करून दिले, तर पुढे जे काही होईल त्यासाठी तयार रहा.
सोनमचा विरोध असतानाही तिच्या आईवडिलांनी राजा रघुवंशीसोबत लग्न लावून दिले. जातीबाहेर लग्न केल्यावर बदनामी होईल असे सांगून सोनमला तिच्या आईने तयार केले होते. पण, सोनम शेवटपर्यंत तयार झाली नाही. अखेर तिने लग्नानंतर हनिमूनला नेऊन राजाला संपवलं.