शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:43 IST

Sonam Raghuwanshi Latest News: सोनम रघुवंशीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली. त्यांनी हत्या कशी केली? हा सगळा घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

Sonam Raghuwanshi Video: हनिमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर सोनम रघुवंशी राजा रघुवंशीचा काटा काढला. बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत मिळून सोनमने राजाची हत्या करण्याचा कट रचला आणि राजच्या मित्राच्या मदतीने शिलाँगमध्ये राजाला संपवलं. राजाची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली, याचा तपास पोलीस करत असून, आता आरोपींना ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली तिथे आणण्यात आले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजा रघुवंशी आणि सोनम हे लग्नानंतर हनिमूनसाठी गेले होते. पण, सोनमने हनिमूनला जाण्यापूर्वीच राजाच्या हत्येचा प्लॅन तयार केला होता, अशी माहिती आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आलेली आहे. राजाची धारदार शस्त्राने हत्या करून नंतर मृतदेह दरीत फेकण्यात आला होता. 

राजा रघुवंशीची कशी केली हत्या? 

सोनम राजाला अशा ठिकाणी घेऊन गेली, जिथे लोक नव्हते. तिथे नेल्यानंतर त्याची राज आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने हत्या केली. पण, आरोपींना राजाची हत्या करण्यापूर्वी काय केलं? हत्या कशी केली आणि हत्या केल्यानंतर काय केलं? हा सगळ्या घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीस आरोपींना सोहरातील त्या ठिकाणी पोहोचले. 

कुठे केली होती राजाची हत्या?

सोहरामध्ये वेई सावडोंग धबधबा आहे, ज्याला तीन स्तरीय धबधबा म्हणूनही ओळखले जाते. याच ठिकाणी सोनमने राज आणि त्याच्या मित्राच्या मदतीने राजाची हत्या केली होती. आरोपींनी राजा कसे संपवले याचा पूर्ण सीन रिक्रिएट करण्यात आला. 

मेघालयाच्या पोलीस महासंचालक इदाशिशा नोंग्रांग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात आणखी कुठली बाजू आहे का, त्याचाही आम्ही तपास करत आहोत. कारण ही खूपच दुर्मिळ घटना आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या (सोनम) मनात पतीबद्दल इतका द्वेष तयार झाला होता.

वाचा >>बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर 

सोनम रघुवंशी (२५) आणि राजा रघुवंशी (२९) यांचे ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दहा दिवसांनी म्हणजे २१ मे रोजी ते हनिमूनसाठी आसाममधील गुवाहाटी मार्गे मेघालयात गेले होते. 

२३ मे रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरामध्ये असलेल्या नोंगरियाट गावात त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर ते बाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेहच पोलिसांना मिळाला. तर ९ जून रोजी सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस