"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:22 IST2025-06-18T19:21:21+5:302025-06-18T19:22:08+5:30

रे तर, अँकर हे सर्व गमतीत बोलत होता. मात्र, त्याचे हे गमतीत बोललेले खरे होईल, असा कुणी विचारही केला नसेल....!

sonam raghuvanshi raja raghuvanshi viral video and the anchor said jokingly it turned out to be true Watch the full VIDEO | "राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास, हळू हळू पुढे सरकत आहे. या प्रकरणात रोजच्या रोज नव-नवे खुलासे होत आहेत. मेघालय पोलीसांनी सोनम आणि इतर आरोपींसह मंगळवारी क्राइम सीन रिएक्रिएट केला. यानंतर, पोलिसांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सोनम आणि राजाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लग्नसमारंभाशी संबंधित एका कार्यक्रमाचा आहे. यात अँकर, सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांना एकमेकांना वचन देण्यास सांगत आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी अँकर राजाला गमतीत जे काही बोलला, ते खरे ठरले आहे. 

काही वचन देण्यास सोनमचा नकार -
3 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक अँकर सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशीसोबत स्टेजवर दिसत आहे. तो त्या दोघांनाही एकमेकांना वचन देण्यास सांगत आहे. येथे राजा प्रत्येक वचन देताना दिसत आहे. तर, सोनम काही वचन देण्यास नकार देताना दिसत आहे. याच वेळी अँकर सोनमला सांगतो, आपण वचन द्या की, लग्नानंतर, राजा आपल्या मित्रांसोबत, कुठेही जाओ, कुठेही पार्टी करो, कुठेही तोंड काळे करो, मी कधी असे म्हणणार नाही की, कोठे होतास? कुणासोबत होतास?

...अन् खरे ठरले अँकरचे शब्द - 
सोनमने यांपैकी कुठलीही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला. यावर, अँकर राजा रघुवंशीला म्हणाला, "राजा भाई तुम तो गए". खरे तर, अँकर हे सर्व गमतीत बोलत होता. मात्र, त्याचे हे गमतीत बोललेले खरे होईल, असा कुणी विचारही केला नसेल. हा व्हिडिओ लग्नाच्या एक दिवस आधीचा म्हणजेच 10 मेचा आहे. राजा आणि सोनम यांचे 11 मेरोजी लग्न झाले होते.

Web Title: sonam raghuvanshi raja raghuvanshi viral video and the anchor said jokingly it turned out to be true Watch the full VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.