सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:18 IST2019-08-26T18:10:01+5:302019-08-26T18:18:21+5:30

सखूबाई यांच्या मुलीच्या घरातील सामान घेऊन जात असल्याने त्यांनी त्यास विरोध केला.

son- in -law beaten up to mother-in-law | सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण 

सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण 

पिंपरी : घरातील सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाने सासूला मारहाण केली. तसेच सासूच्या डोक्यात मारून जखमी केले. चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टीत रविवारी (दि. २५) हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश चंद्रकांत पाटील (वय ३०), मंगेश चंद्रकांत पाटील (वय २८), गणेश बाबासाहेब शिंद्रे (वय २३), संजय जगन चव्हाण (वय ३४, सर्व रा. चेंबूर, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सखूबाई तुकाराम डोंगरे (वय ५०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सखूबाई रविवारी त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा जावई राजेश पाटील त्याच्या इतर साथीदारांसोबत आला. सखूबाई यांच्या मुलीच्या घरातील सामान घेऊन जात असल्याने त्यांनी त्यास विरोध केला. त्याचा राग येऊन आरोपींनी शिवीगाळ करून हाताने मारहाण करून तसेच आरोपी मंगेश पाटील याने डोक्यात मारून फिर्यादी  सखूबाई यांना जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: son- in -law beaten up to mother-in-law