जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 10:20 PM2022-05-09T22:20:20+5:302022-05-09T22:20:53+5:30

Fraud case : दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता.

Sold the house saying mother was dead, the police went to Uttarakhand and handcuffed the son | जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

googlenewsNext

गोरखपूर : जिवंत आई वारल्याचे सांगून घर विकणाऱ्या आरोपीला शाहपूर पोलिसांनीउत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून अटक केली. ट्रान्झिट रिमांडवर पोलिसांनी त्याला गोरखपूरला आणले तेथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता.

हे प्रकरण आहे

मूळचे गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील शेरपूर काला गावचे रहिवासी असलेले आकाश गिरी याचे शाहपूरच्या जंगल साळीग्राममध्ये घर आहे. आई-वडिलांना मृत सांगून आकाश गिरीने २०१६ मध्ये ते दुर्गापुरम कॉलनी, पास्टरबाजार येथील रहिवासी असलेल्या वीर विपुल सिंग याला विकले. घरात गेल्यावर कळले की, तेथे आधीपासून कोणीतरी राहत आहे आणि आकाशची आई सीमा गिरी अजूनही जिवंत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडितेने न्यायालयात अर्ज दाखल केला. डिसेंबर 2020 मध्ये शाहपूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आकाश गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासात साथीदारांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. पोलिसांच्या शोधात आकाश गिरी हा उत्तराखंडमधील उधमक्ष नगर जिल्ह्यात राहत असल्याचं कळलं. एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले की, पाळत ठेवून प्रभारी निरीक्षक शाहपूर आणि त्यांच्या टीमने उत्तराखंडमधून आरोपीला अटक केली. तेथून त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोरखपूरला आणण्यात आले.

Web Title: Sold the house saying mother was dead, the police went to Uttarakhand and handcuffed the son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.