उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:07 PM2024-05-27T12:07:56+5:302024-05-27T12:18:25+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत.

Lok Sabha Election 2024 Where and how much loss of BJP in Uttar Pradesh, Bihar and Maharashtra? Big claim of Prashant Kishor | उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, ४ जून रोजी निकास समोर येणार आहेत. याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे करण्यास सुरूवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निकालांवर भाकीत केले आहे. "भाजप ३७० चा आकडा गाठत नाहीये. मात्र, भाजप २७० च्या खाली जात नसल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले. 

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले आहे. "२०१९ च्या तुलनेत यावेळी भाजप चांगली कामगिरी करेल. गेल्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. भाजप यावेळी यापेक्षा चांगली कामगिरी करणार आहे. गेल्या वेळी भाजपने जिंकलेल्या ३०३ जागांपैकी भाजप कुठून जिंकला हे पाहावे लागेल. या ३०३ जागांपैकी भाजपने उत्तर-पश्चिममध्ये २५० जागा जिंकल्या. यावेळी भाजपचे या भागात नुकसान होते का, हे पाहावे लागेल, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

प्रशांत किशोर म्हणाले, दुसरे क्षेत्र पूर्व आणि दक्षिण आहे. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश. या भागात भाजपकडे सध्या ५० जागा आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्ही राज्यांमध्ये वाढत आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाजपच्या जागा १५-२० ने वाढत आहेत. 

"योगेंद्र यादव २७२ जागा येत नसल्याचे सांगत आहेत. ते जवळपास २६८ जागांचा विचार करत आहेत. मात्र असे असतानाही भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान होत असल्याचा लोकांचा विश्वास आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

'४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल'

महाराष्ट्रात विरोधकांनी जास्तीत जास्त २०-२५ जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या २३ जागा आहेत, म्हणजेच जागांची संख्या अजूनही कमी होत नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. "काही लोक यूपीमध्ये संख्या कमी होत असल्याचे सांगत आहेत. पण हे विसरत आहेत की, २०१४ च्या तुलनेत गेल्या वेळी भाजपला बिहार आणि यूपीमधून जवळपास २५ जागा गमवाव्या लागल्या होत्या. कारण सपा-बसपाने एकत्र निवडणूक लढवली होती. यूपीमध्ये भाजपच्या २० जागा कमी होत आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर मी म्हणेन भाजपचे कुठे नुकसान झाले? त्यांनी आधीच १८ जागा गमावल्या आहेत. भाजपने ४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल. पण हे ना विरोधी पक्ष सांगत आहे ना पक्ष, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

Web Title: Lok Sabha Election 2024 Where and how much loss of BJP in Uttar Pradesh, Bihar and Maharashtra? Big claim of Prashant Kishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.