लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 22:24 IST2021-09-20T22:06:27+5:302021-09-20T22:24:40+5:30

Prostitution in Logde :हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो रूम्स लॉज येथे शनिवारी (दि. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई केली.

Social Security Squad raids prostitution in lodge | लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा 

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा 

ठळक मुद्दे लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय २५, रा. आनंतानगर, हिंजवडी, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पिंपरी : लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा मारून दोन महिलांची सुटका केली. हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो रूम्स लॉज येथे शनिवारी (दि. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई केली.


लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय २५, रा. आनंतानगर, हिंजवडी, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी मंगेश सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंतानगर, हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारला. आरोपी मंगेश याने लखन यांच्याकडून वेश्याव्यवसायासाठी दोन महिलांना प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून त्यावर त्याने आपली उपजीविका भागवली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Social Security Squad raids prostitution in lodge