... So the security of Meenakshi Amman Temple in Madurai was increased | ... म्हणून मदुराईतील मीनाक्षी अम्मन मंदिराची सुरक्षा वाढवली 
... म्हणून मदुराईतील मीनाक्षी अम्मन मंदिराची सुरक्षा वाढवली 

ठळक मुद्देजगप्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर आज मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर येथे पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. . ईमेलद्वारे काल रात्री पोलिसांना मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. 

तामिळनाडू - काल रात्री सुरक्षा यंत्रणांना ईमेलद्वारे मदुराईतील जगप्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर आज मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर येथे पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. 

आज बॉम्ब स्कॉड या मंदिर परिसराची पाहणी करत असून कडेकोट बंदोबस्त मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच त्यांना आता दर्शनासाठी जाण्यास परवानगी मिळत आहे. बॉम्ब डिस्पोझल पथक मंदिराबाहेर आणि आत तैनात करण्यात आले आहे. ईमेलद्वारे काल रात्री पोलिसांना मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. 

Web Title: ... So the security of Meenakshi Amman Temple in Madurai was increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.