"भावा, चालवू नकोस"; मित्राच्या सूचनेनंतर तरुणाने हसत हसत स्वतःवर झाडली गोळी, थरार कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:53 IST2026-03-17T12:44:31+5:302026-03-17T12:53:47+5:30

दिल्लीत एका तरुणाने व्हिडीओ शूट करत असतानाच स्वतःवर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे.

Smile Shoot Collapse Chilling Video Captures Man Ending Life During Live Recording | "भावा, चालवू नकोस"; मित्राच्या सूचनेनंतर तरुणाने हसत हसत स्वतःवर झाडली गोळी, थरार कॅमेऱ्यात कैद!

"भावा, चालवू नकोस"; मित्राच्या सूचनेनंतर तरुणाने हसत हसत स्वतःवर झाडली गोळी, थरार कॅमेऱ्यात कैद!

Delhi Crime: पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर भागात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत भावाच्या समोर, कॅमेरा सुरू असताना स्वतःच्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. महत्त्वाचे म्हणजे, जो व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, त्याला या भयानक कृत्याची थोडीही कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. न्यू अशोक नगरमधील दल्लूपुरा भागात ही घटना घडली. पवनचा चुलत भाऊ हिमांशू हा आपल्या मोबाईलमध्ये पवनचा व्हिडिओ शूट करत होता. सुरुवातीला हा प्रकार केवळ एक गंमत किंवा शस्त्रासोबतचा स्टंट वाटत होता.

व्हिडिओमध्ये पवन पिस्तूलमध्ये मॅगझिन लोड करताना दिसत आहे. यावेळी रेकॉर्डिंग करणारा हिमांशू त्याला सूचनाही देत होता. तो म्हणतोय, "बटण दाब, ते आत जाईल." मॅगझिन लोड केल्यानंतर पवनने पिस्तूल लॉक केली. त्यावेळी हिमांशूने भावा, चालवू नकोस असं म्हणत त्याला सावधही केले होते.
 
हसत हसत ओढला ट्रिगर

व्हिडिओमध्ये दिसणारा पवन अत्यंत तंदुरुस्त दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. त्याने पिस्तूल आपल्या छातीच्या डाव्या बाजूला लावली, कॅमेऱ्याकडे पाहून एक स्मितहास्य दिले आणि अचानक ट्रिगर ओढला. गोळी झाडताच पवन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. हा प्रकार पाहून व्हिडिओ शूट करणाऱ्या हिमांशूच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडीओमध्ये तो धक्क्याने ओरडताना ऐकू येत आहे, भावा, हे तू काय केलंस?.

परवानाधारक शस्त्राचा वापर

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासात धक्कादायक बाब समोर आली. ज्या पिस्तूलने पवनने स्वतःचा जीव घेतला, ती परवानाधारक होती आणि ती व्हिडिओ शूट करणाऱ्या हिमांशूच्या नावावर होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलीस तपास सुरू

पवनने हे टोकाचे पाऊल का उचलले? हा निव्वळ अपघात होता की पूर्वनियोजित आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत. हिमांशूची देखील चौकशी केली जात असून, पोलीस या घटनेच्या सर्व बाजू तपासून पाहत आहेत. हसत खेळत चाललेल्या व्हिडिओ शूटिंगचे रूपांतर अशा भयंकर घटनेत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Web Title : दिल्ली: वीडियो बनाते समय शख्स ने खुद को मारी गोली, दोस्त ने रिकॉर्ड किया खौफनाक मंजर

Web Summary : दिल्ली में एक 28 वर्षीय व्यक्ति ने वीडियो बनाते समय खुद को गोली मार ली। चचेरे भाई ने घटना को रिकॉर्ड किया। चेतावनी के बावजूद, उसने बंदूक लोड की, मुस्कुराया और ट्रिगर दबा दिया। लाइसेंस वाली पिस्तौल चचेरे भाई की थी, जिससे पूछताछ जारी है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Delhi Man Shoots Himself Dead During Video Recording; Friend Films Horror

Web Summary : In Delhi, a 28-year-old man fatally shot himself while his cousin filmed. He loaded the gun, smiled, and pulled the trigger despite a warning. The licensed pistol belonged to the cousin, who is now being questioned. Police are investigating the incident.