रुग्णालयातील लिफ्टमध्ये सापडला २४ वर्षांपूर्वीचा सांगाडा, पाहून उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 06:09 PM2021-09-02T18:09:20+5:302021-09-02T18:10:10+5:30

Crime News: उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील ओपेक कॅली रुग्णालयातील लिफ्टमध्ये बुधवारी रात्री २४ वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

A skeleton found in the hospital elevator in Basti | रुग्णालयातील लिफ्टमध्ये सापडला २४ वर्षांपूर्वीचा सांगाडा, पाहून उडाली एकच खळबळ

रुग्णालयातील लिफ्टमध्ये सापडला २४ वर्षांपूर्वीचा सांगाडा, पाहून उडाली एकच खळबळ

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील ओपेक कॅली रुग्णालयातील लिफ्टमध्ये बुधवारी रात्री २४ वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. २४ वर्षांपूर्वी बंद पडलेली लिफ्ट उघडली असता आतमध्ये हा सांगाडा सापडला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या सांगाड्यामागचे गुढ उलगडण्यासाठी पोलीस आणि फॉरेंसिक टीमकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी हा सांगाडा जप्त करून डीएनए तपासासाठी पाठवला आहे. आता तपासानंतरच आता हा सांगाडा किती जुना आहे हे समोर येईल. (A skeleton found in the hospital elevator in Basti )

हा सांगाडा २४ वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. १९९१ मध्ये बस्तीमध्ये ५०० बेड असलेल्या ओपेक कॅली रुग्णालयाचे काम सुरू झाले होते. मात्र आतापर्यंत संपूर्ण इमारतीचा ताबा रुग्णालय प्रशासनाकडे आलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, १९९७ पर्यंत लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट खराब झाल्याने ती १९९७ मध्ये बंद झाली. २४ वर्षांनंतर ही लिफ्ट दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आली असता त्यामध्ये मानवी सांगाडा सापडला.

पोलिसांनी या सांगाड्यामागच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी जिल्ह्यामधील पोलीस ठाण्यांमधून २४ वर्षांपूर्वी हरवलेल्या लोकांचे रेकॉर्ड मागवले आहे. डीएनए रिपोर्टच्या आधारावर २४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांशी डीएनए जुळवला जाईल. मात्र सध्यातरी मृत व्यक्ती कोण आहे. आणि एवढी वर्षे हा सांगाडा लिफ्टमध्ये कसा काय अडकून राहिला, ही बाब गुढच बनली आहे. आता डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे गुढ उलगडणार आहे.  

Web Title: A skeleton found in the hospital elevator in Basti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.