मोटारीच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:22 IST2019-01-01T13:21:59+5:302019-01-01T13:22:28+5:30

भरधाव वेगातील मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.

A six-year-old girl was killed in a car crash | मोटारीच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार 

मोटारीच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार 

पिंपरी : भरधाव वेगातील मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे गुरव येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. लावण्या सचिन कडलग (वय ६, रा. रुतुजा हाइटस, रामनगर, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. दिलीप खंडू शिंदे (वय ३१ रा. ज्ञानेश पार्क, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या मोटार चालकाचे (आरोपी) नाव आहे. सचिन सुभाष कडलग (वय ३४) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास लावण्या ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी दिलीप शिंदे हा मोटार घेऊन भरधाव वेगात आला. त्याच्या मोटारीची लावण्या हिला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लावण्या हिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत

Web Title: A six-year-old girl was killed in a car crash