शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अनैतिक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 3:38 PM

Murder : सालेबर्डी येथील प्रकार : ७० किमी दूर चोवा नाल्यावर आवळला गळा

ठळक मुद्देचोवा नाल्यावरील पुलाजवळ रस्ता निर्मनुष्य असल्याचे पाहून गळा आवळून विहानचा खून केला. या घटनेची माहिती होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. 

भंडारा : अनैतिक संबंध बघितल्याने एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण करुन गावापासून ७० किमी दूर एका निर्जनस्थळी गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी येथील हा बालक असून त्याचा खून भंडारा तालुक्यातील चोवा नाल्याजवळ करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

नीलेश चंदन गजभिये (२३) रा.सालेबर्डी ता.मोहाडी असे आरोपीचे नाव आहे. रविवार २२ नोव्हेंबर रोजी विहान अचानक घरुन बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळ गाढले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, आंधळगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु विहानचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान मंगळवारी गावातील नीलेश गजभिये या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याच्या बयाणात तफावत जाणवत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता विहानचा खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भंडारा तालुक्यातील पहेला जंगलातील चोवा नाल्यावरील पुलात फेकल्याचे सांगितले.अपहरण करुन केला खूनचिमुकल्या विहानने नीलेशचे असलेले अनैतिक संबंध रविवारी बघितले होते. त्यामुळे आपली गावात बदनामी होईल यामुळे त्याने विहानला ठार मारण्याचा कट रचला. रविवारी दुपारी २.३० वाजता मोबाईल दाखविण्याच्या उद्देशाने त्याला मोटारसायकलवर बसविले आणि थेट भंडारा येथे आणले. तेथून तो विहानला घेऊन पहेला जंगलात गेला. चोवा नाल्यावरील पुलाजवळ रस्ता निर्मनुष्य असल्याचे पाहून गळा आवळून विहानचा खून केला. या घटनेची माहिती होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. 

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक