शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहार जेलमधून मुंबईत पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:20 IST

शनिवारी विशेष कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर नवलखा यांनी मैत्रीण सहबा हुसेन व वकील यांना फोनवरून ही माहिती दिली.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात दिल्लीतील तिहारमधून नवलखा यांना तुरूंगातून मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याला शाळेत बांधलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यापूर्वी कैद्यांना क्वारंटाईन केले जात आहे.

एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांचे वकील व कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, खारघरमधील एका शाळेला तात्पुरती तुरूंग करण्यात आले आहे. तेथे कैद्यांना अतिशय वाईट स्थितीत ठेवले गेले आहे. शनिवारी विशेष कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर नवलखा यांनी मैत्रीण सहबा हुसेन व वकील यांना फोनवरून ही माहिती दिली. गेल्या महिन्यात दिल्लीतील तिहार जेलमधून नवलखा यांना मुंबईत येथे हलविण्यात आले होते.  मात्र, त्यानंतर त्यांना शाळेत बांधलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.कोरोना साथीच्या आजारामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यापूर्वी कैद्यांना क्वारंटाईन केले जात आहे. सहबा हुसेन यांनी सांगितले की, १५ दिवसानंतर नवलखाशी बोलले. ते म्हणाले की, ३५० कैद्यांना सहा खोल्यांमध्ये तीन शौचालये आणि सात युरिनल उपलब्ध आहेत. आंघोळीसाठी एकच स्नानगृह आहे. जिथे एक मग आणि बादली आहे. नवलखा ३५ कैद्यांसह एका खोलीत राहत आहेत.सहबा म्हणाल्या की, कोरोनाच्या  भीतीमुळे काही कैदी शुद्ध हवा येत नसूनही संसर्ग होण्याच्या भीतीमुळे गॅलरीध्ये झोपले होते. पुढे त्या म्हणाल्या की, तिथल्या सद्यस्थितीबद्दल जाणून घेतल्यानंतर मी त्यांच्या तब्येतीबद्दल अतिशय चिंताग्रस्त आहे. त्यांच्यासारख्या कैद्याला ही अमानुष वागणूक दिली जात आहे. कैद्यांना बाह्य जगाविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. मी तुम्हाला सांगते की, गेल्या महिन्यात राज्य कारागृह विभागाने नवीन कैद्यांना तुरूंगात पाठवण्यापूर्वी त्यांना तातडीने तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवण्याची मागणी केली होती. नवीन कैद्यांना २१ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा आणि स्क्रिनिंगचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु २१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही खारघर शाळेतील कैद्यांना मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

टॅग्स :jailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा