शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
4
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
6
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
7
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
8
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
9
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
10
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
11
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
12
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
13
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
14
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
15
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
16
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
17
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
18
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
19
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
20
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एकाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना अटक, एका संघर्षग्रस्त बालकाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:40 IST

तीन दिवसात झालेल्या दोन खूनांच्या गंभीर गुन्ह्यांमुळे येरवडा व परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअटक आरोपींना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश

पुणे (विमाननगर): येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या नितीन कसबे याचा बुधवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. कुणाल किसन जाधव (वय20, रा. खराडी), अभिषेक उर्फ अभय नारायण पाटील (वय 19 रा. लोहगाव), अक्षय सतीश सोनवणे(वय 20, रा. कामराजनगर येरवडा), आकाश उर्फ टक्क्या भगवान मिरे (वय 23, रा. सेवक चौक येरवडा), अर्जुन दशरथ मस्के(वय 19,  रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी पाच जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यासोबतच गुन्ह्यातील आणखी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.  बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नितीन कसबे याच्यावर दहा ते पंधरा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला होता. खूनाचा गंभीर गुन्हा करून सर्व आरोपी फरार झाले होते. गंभीर गुन्ह्यातील सहा आरोपींना येरवडा पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. पंचशीलनगर येथे सोमवारी रात्री प्रतीक वन्नाळे  या युवकाचा किरकोळ वादातून आठ जणांनी कुऱ्हाड दगडाने ठेचून खून केला होता. गंभीर घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी येरवडा नितीन कसबे या पूर्व रेकॉर्डवरील आरोपीचा हल्लेखोरांनी खून केला. तीन दिवसात झालेल्या दोन खूनांच्या गंभीर गुन्ह्यांमुळे येरवडा व परिसरात खळबळ उडाली आहे. 

कोरोनाच्या वाढतो संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगार वैयक्तिक जामिनावर बाहेर येत आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून परिसरात गुन्हे घडत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी येरवडा सह परिमंडळ 4 विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.येरवडा परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी नागरिकांनी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशन अथवा पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 4 येरवडा क्षेत्रीय कार्यालय येरवडा याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालयMurderखून