पैशाच्या तगाद्याला कंटाळून बहिणींनी केले विषप्राशन; एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:15 IST2019-03-11T18:14:46+5:302019-03-11T18:15:14+5:30
मुलाने महापालिकेत नोकरी लावण्यासाठी काही जणांकडून पैसे घेतले. त्यानंतर मुलगा गायब झाला...

पैशाच्या तगाद्याला कंटाळून बहिणींनी केले विषप्राशन; एकीचा मृत्यू
पिंपरी : मुलाने महापालिकेत नोकरी लावण्यासाठी काही जणांकडून पैसे घेतले.त्यानंतर मुलगा गायब झाला. दरम्यान, पैसे दिलेल्यानी मुलाच्या आईकडे तगादा लावल्याने मुलाच्या आईसह मावशीने विष प्राशन केले. यामध्ये आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चिंचवड, कृष्णनगर येथे घडली. मंगल गोकूळ नार्वेकर (वय ६२) आणि अलका राजू बाबर (वय ४५, दोघीही रा. जीमगेश बिल्डिंग, कृष्णानगर, चिंचवड) असे विष प्राशन केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत. यापैकी मंगल नार्वेकर यांचा रविवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्वेकर यांच्या मुलाने महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून काही जणांकडून पैसे घेतले होते. पैसे घेतल्यानंतर तो गायब झाला . त्यानंतर पैसे दिलेले लोक मंगल नार्वेकर यांच्याकडे पैसे मागू लागले. याला कंटाळून एकत्रित राहत असलेल्या या दोघी बहिणींनी ६ मार्चला सकाळी विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएमएच) दाखल करण्यात आले. मात्र मंगल नार्वेकर यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.