दुर्घटना टळली; ठाण्यात नितीन कंपनीजवळ कोसळला सिग्नलचा खांब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 17:38 IST2019-06-14T17:35:32+5:302019-06-14T17:38:35+5:30
कालचीच होर्डिंगची घटना ताजी असताना ही घटना समोर आली आहे.

दुर्घटना टळली; ठाण्यात नितीन कंपनीजवळ कोसळला सिग्नलचा खांब
ठाणे - नितीन कंपनी परिसरातील सिग्नलनजीक गंजलेला सिग्नलचा खांब कोसळून रस्त्यावर पडला. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी आगारातले होर्डिंग कलंडल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरूवारीच ताजी असताना आज सिग्नलचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी सिग्नलमध्ये लोंबकळणारी वायर टीएमटी बसच्या छताला अडकली. त्यामुळे हा सिग्नलचा खांब कोसळला. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची दखल घेतली आहे. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कालचीच होर्डिंगची घटना ताजी असताना ही घटना समोर आली आहे.
नितीन कंपनीच्या सिग्नलवर खांब कोसळला. सिग्नलचा खांब जीर्ण झाला होता. बसचा वायरला धक्का लागल्याने घटना https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2019