श्रावणीच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:51 PM2019-05-15T19:51:41+5:302019-05-15T19:53:03+5:30

या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.

Shravani's death remains intact; Police are investigating more | श्रावणीच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

श्रावणीच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देवणीचा अपघात झाला की आत्महत्या, हे गूढ अजूनही कायम आहे.आईवडिलांच्या जबाबातून मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत होईल.अद्याप त्यांचे जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत.

मुंबई - दादर आग प्रकरणातील श्रावणी चव्हाण (२६) हिच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी दादर पोलिसांनी नातेवाइकांसह मित्रमंडळींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात, शेजारच्यांचा समावेश आहे. त्यांनी घटनेच्या दिवसाचा उल्लेख त्यात केला आहे.
घरातून धूर बाहेर आल्याचे पाहून आम्ही घराबाहेर आलो आणि आग विझविण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती जबाबात दिली आहे. श्रावणीचा अपघात झाला की आत्महत्या, हे गूढ अजूनही कायम आहे. आईवडिलांच्या जबाबातून मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत होईल. अद्याप त्यांचे जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.

Web Title: Shravani's death remains intact; Police are investigating more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.