शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

आफताबनं २०२० मध्येही श्रद्धाला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, चौकशीत नवा खुलासा! नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 15:06 IST

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धा वालकरचे आता असेच काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरून या हत्येचा संपूर्ण कट कसा रचला गेला याचा अंदाज लावला जात आहे. श्रद्धाचे जुने सहा फोटो समोर आले आहेत की यात श्रद्धाच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहेत. पहिल्या चित्रात क्रूरतेचा संपूर्ण अंदाज येतो. आफताबचं श्रद्धासोबत वारंवार भांडण होत असल्याचा हा पुरावा आहे. 

चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो आला समोर

२०२० साली श्रद्धाला मुंबईतील रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा आणि आफताबमध्ये तणाव होता. दोघंही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडलाही ते गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही आफताबने श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या भांडणाबद्दल श्रद्धानं तिच्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं. पोलिसांनी आफताबला पोलीस ठाण्यात बोलावलं असता त्यानं आत्महत्येची धमकी देत ​​श्रद्धाला तक्रार परत घ्यायला लावली होती. दिल्ली पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आफताब श्रद्धाला कशी बेदम मारहाण करायचा याचा अंदाज समोर आलेल्या फोटोवरुन लावता येईल. हे फोटो श्रद्धाच्या एका मित्रानं उपलब्ध करून दिले आहेत. पण लिव्ह-इनमध्ये राहताना या सगळ्याचा सामना करूनही तिला जिवंत राहायचं होतं आणि आफताबसोबत आनंदी राहायचं होतं. म्हणूनच या फोटोतही ती हसताना दिसते. तर तिच्या मानेपासून गालापर्यंत दुखापतीच्या खुणा दिसत आहेत.

३ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलंश्रद्धाला ३ डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाठ आणि मणक्यामध्ये तिला तीव्र वेदना होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वसईच्या ओझोन हॉस्पिटलमध्ये पाठदुखी, मानदुखी अशा तक्रारींसह तिला दाखल करण्यात आलं होतं. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबने मारहाण केली आणि तो गांजाही घेत असे. दिल्लीला पोहोचण्याच्या काही दिवस आधी म्हणजेच ४ मे रोजी श्रद्धा आफताबसोबत उत्तराखंडमधील शिवपुरीजवळील वशिष्ठ गुहेत गेली होती. ही गुहा गंगा नदीच्या काठावर आहे, तिथून श्रद्धाने शेवटची व्हिडिओ रील पोस्ट केला होता. 

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!

यानंतर, ११ मे रोजी श्रद्धाने एका कॅफेमध्ये तिचा एक फोटो पोस्ट केला होता. सूत्रांनुसार, हे कॅफे हिमाचलमध्ये आहे. तपासासाठी या ठिकाणांना भेट देऊनही पोलीस तपास करू शकतात. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होतं पण आफताब दिल्लीला शिफ्ट होण्याच्या विरोधात होता. आफताब बहुतांश वेळ त्याच्या फोनवर चॅट करत असे आणि जेव्हा श्रद्धाने विचारले की तो कोणासोबत चॅट करत आहे, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. या कारणावरून दोघांमध्ये भांडणं होत होती.

आफताब श्रद्धाला हिमाचल आणि उत्तराखंडला घेऊन गेलाश्रद्धा हत्येचा गुन्हा घडवण्यापूर्वी आफताब श्रद्धासोबत हिमाचल आणि उत्तराखंडला गेला होता, जेणेकरून छोट्या भांडणामुळे दोघांमधील अंतर दूर व्हावे. आता दक्षिण जिल्हा पोलिसांनी दिल्लीतील इतर जिल्ह्यांना गेल्या काही महिन्यांत त्यांच्या भागात शरीराचे कोणतेही अवयव आढळल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला यानं १८ मे रोजी संध्याकाळी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (२७) हिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या राहत्या घरी हा सगळा प्रकार घडला. फ्रीज ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे तो सुमारे तीन आठवडे वेगवेगळ्या भागात फेकत राहिला.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी