पुण्यात भरदिवसा युवकावर गाेळीबार ; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:59 IST2018-10-31T16:54:51+5:302018-10-31T16:59:40+5:30
पुण्यातल्या शुक्रवार पेठेत भरदिवसा युवकावर गाेळीबार करण्यात अाला अाहे.

पुण्यात भरदिवसा युवकावर गाेळीबार ; कारण अस्पष्ट
पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे अाळीमध्ये भरदिवसा एका युवकावर गाेळीबार झाला अाहे. दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली असून यात युवक जखमी झाला अाहे. गजबजीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती.
मंगेश धुमाळ (वय 32, रा. शिंदे अाळी, शुक्रवार पेठ) असे या गाेळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव अाहे. दुपारी 3.30 च्या सुमारास मंगेश याच्यावर दाेघांनी गाेळीबार केला तसेच धारदार शस्त्राने वार केले. जखमी मंगेशने जवळच असलेल्या खडक पाेलीस ठाण्यात धाव घेतली. पाेलिसांनी मंगेशला तात्काळ ससून रुग्णालयात हलवले. गुन्हे शाखेचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून गाेळीबार करणाऱ्यांचा शाेध घेण्यात येत अाहे. मंगेशच्या पायाला गाेळी लागली असून त्याच्या डाेक्यात काेयत्याने वार केल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या अाहेत. पूर्ववैमनस्यातून मंगेशवर गाेळीबार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. परंतु गाेळीबार करणारे काेण हाेते व त्यांनी कुठल्या कारणाने गाेळीबार केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. खडक पाेलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे अाराेपींचा शाेध घेत अाहेत.
भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी गाेळीबार झाल्याने परीसरात खळबळ उडाली अाहे. अनेक वरीष्ठ पाेलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अाहेत.