धक्कादायक! गुप्तांग कापून, गळा चिरून तरुणाची भर बाजारात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:29 IST2020-10-09T21:28:58+5:302020-10-09T21:29:44+5:30

Suicide : या घटनेने परिसरात खळबळ उडाली तर बघ्यांची गर्दीही झाली होती. 

Shocking! Young man commits suicide by cutting his genitals and slitting his throat | धक्कादायक! गुप्तांग कापून, गळा चिरून तरुणाची भर बाजारात आत्महत्या

धक्कादायक! गुप्तांग कापून, गळा चिरून तरुणाची भर बाजारात आत्महत्या

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

येवला (नाशिक) - शहरातील बाजारपेठेत भर दुपारी तरूणाने कोयत्याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश अनिल परदेशी (२५, रा. बुंदेलपुरा, येवला) या रंगकाम कारागीर तरूणाने शुक्रवारी, (दि. ९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील बाजारपेठेत नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाजवळ धारदार कोयत्याने स्वत:चे गुप्तांग कापून त्यानंतर गळा चिरून घेवून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली तर बघ्यांची गर्दीही झाली होती. 

 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सदर तरूणात ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप उघड झालेले नसून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Shocking! Young man commits suicide by cutting his genitals and slitting his throat