धक्कादायक! रेल्वे रुळांनजीक महिलेचे शीर सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 15:20 IST2020-01-05T15:17:29+5:302020-01-05T15:20:19+5:30

हे शीर त्या मृत महिलेचे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Shocking! A woman's head was found near the train tracks | धक्कादायक! रेल्वे रुळांनजीक महिलेचे शीर सापडलं

धक्कादायक! रेल्वे रुळांनजीक महिलेचे शीर सापडलं

ठळक मुद्देआता पुन्हा सांताक्रूझ - चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते.

मुंबई - माहीम येथे सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडल्यानंतर विद्याविहार, पनवेल येथे मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. आता पुन्हा सांताक्रूझ - चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. विद्याविहारमध्ये काही दिवसांपूर्वी शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. हे शीर त्या मृत महिलेचे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

विद्याविहारमध्ये सोमवारी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या लोकांनी याबाबत घाटकोपर पोलिसांना माहिती दिली होती. महिलेचा मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळून या ठिकाणी फेकण्यात आला होता. महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिचा मृतदेह विद्याविहारमध्ये फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गेल्या मंगळवारी कुर्ला परिसरात महिलेचे दोन पाय सापडले आहेत. तिच्या शिराचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.


विद्याविहार एसटी डेपोजवळील किरोळ रोडच्या पदपथावर सोमवारी एका चादरीत ३० ते ३५ वयोगटांतील महिलेचा धड आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी धड ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते.

Web Title: Shocking! A woman's head was found near the train tracks