धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:46 IST2020-05-23T21:43:51+5:302020-05-23T21:46:01+5:30

या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. सोनू असं या नराधमाचे नाव असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Shocking! Woman raped for not giving PIN number of ATM card pda | धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

ठळक मुद्दे पीडित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन सोनू तिच्या घरात घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवत महिलेचे दागिने व घरातील पैसे लुटले.बलात्कार करून नराधमाने पीडित महिलेचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाला.

नवी दिल्ली -  जंगपूरा परिसरातील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने त्या घरातील महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने तिच्या एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. सोनू असं या नराधमाचे नाव असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

पीडित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन सोनू तिच्या घरात घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवत महिलेचे दागिने व घरातील पैसे लुटले. त्यानंतर त्याने तिच्याकडून एटीएम कार्ड मागितले. महिलेने एटिएम कार्ड दिले. मात्र त्याचा पिन नंबर न दिल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर महिला ऐकत नसल्याने रागाच्या भरात त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार करून नराधमाने पीडित महिलेचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाला. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोनू इमारतीत येतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली. तसेच त्याच्याजवळील चोरीचे सामान देखील हस्तगत केली. 

बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

Web Title: Shocking! Woman raped for not giving PIN number of ATM card pda