लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 08:50 PM2020-05-22T20:50:16+5:302020-05-22T20:53:23+5:30

मागितली साडे बारा लाखांची लाच

A case has been registered against four persons, including a police officer, for asking bribe of lakhs pda | लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देठाणे ग्रामीण पोलीस दलातील शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांच्यासह ओंकार पातकर, आकाश सावंत, सचिन रांजणे या खाजगी इसमांविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्याची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.       मदत करण्यासाठी तक्रारदारांकडे 50 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती 12 लाख 50 हजार देण्याचे ठरले. याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीत केलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली.

ठाणे - पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी साडेबारा लाखांची मागणी करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांच्यासह ओंकार पातकर, आकाश सावंत, सचिन रांजणे या खाजगी इसमांविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्याची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
      

 

तक्रारदार यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये जामीन देण्यासाठी मदत केल्याबद्दल, त्याचबरोबर त्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी आणि त्यांचे गोठवलेले बँक खाते पूर्वरत सुरू करून देण्यासाठी व इतर ही मदत करण्यासाठी तक्रारदारांकडे 50 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती 12 लाख 50 हजार देण्याचे ठरले. याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीत केलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक नीलिमा कुलकर्णी या तपास करत आहेत.

 

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

Web Title: A case has been registered against four persons, including a police officer, for asking bribe of lakhs pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.