खळबळजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:36 IST2019-07-03T20:11:36+5:302019-07-03T20:36:43+5:30
वसई पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

खळबळजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
नालासोपारा - वसई गावातील वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर सोबत राहणाऱ्या 3 आरोपीनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. पीडित मुलाच्या भावाने वसई पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
वसई गावातील वसतिगृहात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा शिकत असताना 2016 ते डिसेंबर 2017 पर्यंत सोबत राहणाऱ्या तिन्ही आरोपी मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला असून कोणाला सांगू नको म्हणून धमकी सुद्धा देण्यात आली होती. आईने व भावाने मुलाला वसतिगृहात खाण्यासाठी खाऊ आणून दिला होता. पण या तिन्ही आरोपी मुलांना दिला नाही म्हणून पीडित मुलाला शिविगाळ आणि दमदाटी केली होती.