धक्कादायक! उन्नावमध्ये तरुणीने तरुणावर फेकले अॅसिड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 17:47 IST2020-01-28T17:46:09+5:302020-01-28T17:47:54+5:30
पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेत एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिले आहेत.

धक्कादायक! उन्नावमध्ये तरुणीने तरुणावर फेकले अॅसिड
उन्नाव - अॅसिड हल्ल्याचा बळी पडलेल्या तरुणीवर आधारित छपाक या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशमधील एका तरूणावर अॅसिड हल्ल्याची घटना उघडकीस आली आहे. उन्नावच्या मौरवनमध्ये एका तरुणीने तरूणावर अॅसिड फेकले. जखमी झालेल्या तरुणास लखनऊच्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अॅसिड हल्ल्याची माहिती दिलेली नाही. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेत एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि पीडित तरूण हे एकमेकांचे शेजारी आहेत. दोघेही मौरावा परिसरातील गोनामाऊचे रहिवासी आहेत. पीडित तरुण डेअरी चालविण्याचे काम करतो. सोमवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास तो टँकरमध्ये दूध पाठवून डेअरी साफ करीत होता. या वेळी आरोपी तरुणीने त्या तरुणावर अॅसिड फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अॅसिड हल्ल्यात तरूणाचा गळा, कान, छाती व मागील भाग जळून गेलेला आहे. जखमींना ताबडतोब लखनऊच्या पल्स या खासगी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघे देखील वेगवेगळ्या धर्माचे असून हे दोघे बराच काळ एकमेकांशी संपर्कात होते अशी माहिती मिळत आहे.